भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो ; आमदाराचा खळबळजनक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | भाजपचे सदस्य असल्याचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो असा खळबळजनक दावा भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. ते मिरज येथे भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आमदार सुरेश हाळवणकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

भाजपचा सदस्य असल्याचे ओळखपत्र तुमच्या जवळ असेल तर त्यावर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटोआहे. त्यामुळे कोणत्याच टोल नाक्यावर तुमच्याकडून टोल घेतला जाणार नाही असा अजब दावा आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजप सरकार बद्दल विश्वसनीयता कमी झाली आहे.

दरम्यान, आमदार हाळवणकर यांच्या दाव्यानुसार जर खरंच भाजपचे ओळखपत्र दाखवून टोलपासून मुक्तता मिळत असेल तर हा प्रकार कधी थांबणार, याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावं, अशी नवी मागणी आता समोर येत आहे. त्यामुळे याबाबत आगामी काळात सरकार आणि प्रशासन नक्की काय पाऊल उचलणार, हे पाहावं लागेल.

Leave a Comment