मृत्यूच्या दिवशी सुशांत ‘त्या’ ड्रग्ज डिलर सुशांतला का भेटला? सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

नवी दिल्ली ।  अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्या प्रकरणी दर दिवशी नवं नवे खुलासे होत असतानाच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक महत्त्वाचा आणि सर्वांच्या भुवया उंचावणारा गौप्यस्फोट केला आहे. ‘ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशी तो दुबईतील ड्रग डिलरला भेटला होता’, असा दावा स्वामी यांनी ट्विट करत केला आहे.

दुबईतील ड्रग डिलर आणि सुशांतची भेट नेमकी का झाली होती, असा प्रश्न मांडला. सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली नसून ही हत्या आहे, असा दावा स्वामी यांनी यापूर्वीही केला होता. शिवाय या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठीही ते आग्रही होते. त्यातच आता त्यांनी या आत्महत्या प्रकरणातील दुबई कनेक्शनविषयी मुद्दा मांडत सर्वांचं लक्ष वेधलं.

“सुनंदा पुष्कर प्रकरणात सगळ्या महत्त्वाची गोष्ट कोणती होती?, त्यांचं शवविच्छेदन करत असताना एम्सच्या डॉक्टरांना त्यांच्या पोटात कोणती गोष्ट आढळून आली होती? परंतु, श्रीदेवी आणि सुशांत यांच्या प्रकरणात असं काहीच झालं नाही. मात्र सुशांत प्रकरणात दुबईतील ड्रग्स डिलर अयाश खान सुशांतच्या मृत्यूच्याच दिवशी त्याला भेटला होता. का?”, असे प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केले आहेत.

अभिनेता सुशातं सिंह राजपूत यानं आत्महत्या करुन दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला. मात्र अद्यापही या प्रकरणी कोणतीही उकल झालेली नाही. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यातच आता काही मंडळींनी यामध्ये गौप्यस्फोट केल्यामुळं संपूर्ण प्रकरणालाच दर दिवशी एक नवं वळण मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook