‘तू इधर उधर की न बात कर,ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा’ मोदींना राहुल गांधींचा शायरीतून सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यातचं केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App वर बंदीही घातली. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना चांगलंच लक्ष्य केलं होतं. दरम्यान, आज मोदींच्या भाषणाबाबत मोठी उत्सुकता असताना ते आज चीनबाबत काही तरी बोलणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, या भाषणात नरेंद्र मोदींनी चीन मुद्द्यावर बोलणं टाळल्यामुळं काँग्रेसचा भ्रमनिरास झाला असून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक जुना शेर आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत मोदींना टोला लगावला आहे.

मोदींनी आजच्या आपल्या भाषणात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. दरम्यान, राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. चीनने भारताचा बळकावलेला भूभाग आणि २० भारतीय जवांना पत्करावं लागलेलं हौतात्म्य यावरुन राहुल गांधींनी मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. मात्र, आजच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उल्लेख न केल्यानं राहुल गांधी यांनी मोदींना शायरीतून टोला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment