विकासकामांचा निधी पळवल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

शासनाकडून मिळालेल्या शंभर कोटींचा निधी पदाधिकारी व जेष्ठ नगरसेवकांनी पळविला आहे. तर सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या अकार्यक्षम कामामुळे जिल्हा नियोजन समिती व समाजकल्याण समितीचा २० कोटींचा निधी शासनाकडे परतीचा मार्गावर असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिकेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

हाती मिळालेल्या माहितीनुसार स्थायी सभापती व गटनेत्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले. नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर १०० कोटींच्या कामातही मिरजेच्या सदस्यांच्या प्रभागातील कामांना कात्री लावली आहे. काही पदाधिकारी व जेष्ठ नगरसेवकांच्या प्रभागात कोट्यावधी रूपयांचा निधी खर्च होणार आहे. त्यामुळे सामान्य नगरसेवकांवर अन्याय होणार असल्याचा आरोप योगेंद्र थोरात यांनी केला.
दलितवस्ती सुधारणेसाठी चालू वर्षात 8 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून मनपाच्या सामाजिक न्याय समितीमार्फत कामांचे नियोजन करून तसे ठरावही झाले. परंतु प्रशासनाने पाठपुरावा केला नाही. परिणामी लोकसभा आचारसंहितेमुळे या महिन्याची सभाच होणार नाही.आता जिल्हा प्रशासनाने केवळ 3 कोटी 68 लाख रुपयांचा निधीच शिल्लक असल्याने त्याची यादीही कमी करून द्यावी असे कळविले आहे.
त्यामुळे दोन्ही मिळून विकासाचा 20 कोटींहून अधिक निधी बुडित जाणार आहेत. या विरोधात त्यांनी आंदोलन केले. थोरात यांना भविष्यात निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले.

Leave a Comment