पृथ्वीराज चव्हाणांनी केली फडणवीसांच्या मदतीच्या आकडेवारीची ‘अशी’ पोलखोल, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून २ लाख कोटी मिळाल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली आहे. ‘केंद्र सरकारनं महाराष्ट्राला २ लाख ७० हजार कोटी रुपये दिल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा फसवा आहे. केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज हे कर्जाधारित असून त्यात अनेक अटी व शर्ती आहेत. त्यामुळं फडणवीसांनी कर्ज किती आणि रोख रक्कम किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी,’ असं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला एक पत्रक शेअर केला आहे. त्यामधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर टीका केली असून काही मुद्दे मांडले आहेत.

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाले, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच त्यांनी विविध योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासवण्याचा प्रयत्न केला आहे, की महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त दोन लाख कोटी रुपये ही रोख रक्कम आहे. उर्वरित १९ लाख कोटी हे कर्जाच्या स्वरुपातील मॉनेटरी स्टीम्युलस आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला त्या दोन लाखापैकी जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये रोख रक्कम मिळू शकते, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकात म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम रिझर्व्ह बँक उपलब्ध करून देणार असून ही रक्कम १ लाख ६० हजार कोटी आहे, असं फडणवीसांचं म्हणणं आहे. हे साफ खोटं आहे. जीएसडीपीच्या ३ टक्के रक्कम आरबीआयकडून घेण्याची परवानगी राज्यांना आधीपासूनच होती. ती आता २ टक्क्यांनी वाढवली असली तरी त्यातील फक्त अर्धा टक्के म्हणजेच १५ ते १६ हजार कोटी तातडीनं मिळू शकतात. उर्वरीत दीड टक्के (सुमारे ४५ हजार कोटी) रकमेसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत,’ असंही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment