निवडणुकीचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी २१ लाखांचे बक्षीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
प्रथमेश गोंधळे|सांगली प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी चक्क २१ लाख रुपयाचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने ठेवण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्र ही फसवणूक आहे. २०१४ च्या निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन  समितीने देशभरातील ज्योतिषांना अचूक उत्तरासाठी २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ते कोणी स्वीकारले नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीतही भाकीत तंतोतंत सांगणाऱ्या ज्योतिषांना हे आव्हान देत असल्याची माहिती ‘अंनिस’चे राज्य कार्यवाह डॉ. नितीन शिंदे, प्रा. आर्डे, डॉ. संजय निटवे आणि राहुल थोरात यांनी दिली.

 सांगली मध्ये संपन्न होत असलेल्या ज्योतिष संमेलनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे. ‘‘ज्योतिष संमेलनाला आव्हान देण्याची आमची तयारी होती. गतवेळी पुण्यात ज्योतिषांची पोलखोल केल्यानंतर ते हतबल झाले. त्यांनी आमच्यासमोर सपशेल नांगी टाकली. अवकाशात लाखो किलोमीटर दूर असलेले ग्रह हे पृथ्वीवरील मानवी जीवनावर परिणाम करतात या चुकीच्या पायावर ज्योतिष सांगितले जाते. त्यांचा पायाच चुकीचा आहे.

तसेच ‘‘२०१४ च्या निवडणुकीत देशभरातील सर्व ज्योतिषांना अचूक भाकीत वर्तवण्यासाठी आव्हान दिले होते. शंभर टक्के नाही कमी प्रमाणात देखील उत्तर दिल्यास २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले. परंतु ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि इतरांनी ते स्वीकारले नाही. या निवडणुकीतही आम्ही आव्हान देत आहोत. मानवी स्वभावाचा फायदा ज्योतिषी घेतात. विज्ञानाच्या कसोटीवर ते शास्त्र टिकत नाही. सहावी-सातवीच्या पाठ्यपुस्तकात ग्रहताऱ्यांविषयी परिपूर्ण माहिती आहे. त्याची विद्यार्थ्यांना खोलवर व प्रत्यक्षात माहिती देण्याची गरज असल्याचं मतं त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Leave a Comment