सुशांतला प्रसिद्धी मृत्यनंतरच, आधी तो काहीच नव्हता; राष्ट्रवादीच्या ऍड. माजिद मेमन यांची मुक्ताफळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड माजिद मेमन यांनी नवी मुक्ताफळे उधळली आहेत. सुशांत सिंग राजपूत हा मृत्यूआधी प्रसिद्ध नव्हता. मृत्यूनंतरच भारतीय माध्यमांनी त्याला अवास्तव प्रसिद्धी दिली असल्याची प्रतिक्रिया मेमन यांनी दिली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला १ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी त्याचा तपास अजून नीट होऊ शकला नाही. याच प्रकारावरुन महाविकासआघाडी सरकारवर आरोपांच्या फैरी झडत असताना आता महाविकास आघाडीतील लोकांनी प्रत्युत्तरादाखल उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे.

माजिद मेमन यांनी पुढे टीका करताना सुशांत सिंगला भारतीय पंतप्रधान आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षापेक्षा अधिक प्रसिद्धी दिली जात असल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानानांतर सिनेप्रेमी मात्र चांगलेच दुखावले गेले असून तपासात चुका असल्यानेच अशी विधाने केली जात असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. नेटकऱ्यांच्या टीकेनंतर मात्र माजिद मेमन यांनी सारवासारव करत सुशांतच्या टॅलेंटविषयी आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नसल्याचं म्हटलं आहे. आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचंही ते पुढे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment