राहुल गांधी यांच्या त्या मिठी मारण्यावर काय म्हणाले नरेंद्र मोदी वाचा.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | १६ व्या लोकसभेचा कार्यकाल आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील शेवटचे भाषण झाले. ‘गळ्यात पडणे’ आणि ‘गळ्याला गळा लावून भेटणे’ दोहोतला फरक मला लोकसभेत समजला अशाप्रकारे त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेत मिठी मारली होती. या संदर्भाने त्यांनी ही टीका केली.

येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात २०१९ लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आज १६ व्या लोकसभेचा कार्यकाल संपत आहे. सर्व पक्षांचे खासदार आज लोकसभेत उपस्थित होते.
जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी ज्या आसनावर बसले होते, त्या ठिकाणी जाऊन त्यांना मिठी मारली होती. त्यानंतर मोदीसुद्धा आश्चर्यचकित झाले होते. आणि पूर्ण भारतभर राहुल गांधींचे कौतुक होत होते. परंतु त्यानंतर गांधी आपल्या जागी बसले, आणि त्यावरती त्यांनी डोळे मिचकवून प्रतिसाद दिला. हाच मुद्दा नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बोलताना मांडला ‘डोळे मिचकवण्याचा या नाट्यमय प्रकाराचा आनंद संपूर्ण भारताने आणि मीडियाने घेतला आहे.’

‘लालकृष्ण अडवाणी’ आणि ‘मल्लिकार्जुन खर्गे’ यांची लोकसभेतील उपस्थिती पाहता सर्व खासदारांनी त्यांच्याकडून शिकण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, ‘माझ्या पहिल्या प्रधानमंत्री कार्यकालासाठी आपण जो सहयोग दिला, त्याबद्दल सर्व खासदारांचे मी आभारी आहे. तसेच संसदेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभारी आहे. ‘स्वस्थ लोकशाही परंपरेसाठी सुदृढ प्रयत्न आपण असेच करत राहू.’ असे म्हणून त्यांनी उपस्थित खासदारांचे अभिनंदन केले.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

प्रकाश आंबेडकरांनी केली ‘या’ पाच उमेदावारांची घोषणा

राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं – अजित पवार

…तर भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती वाट्टेल तेवढा वेळ देतील ! – डॉ. कुमार सप्तर्षी

Leave a Comment