नवनीत राणा अमरावतीतून लोकसभा लढवण्यास इच्छुक ? पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | दक्षिणाथ्य अभिनेत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नेत्या नवनीत राणा यांनी बुधवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सुनिल वर्हाडे यांच्या अमरावती येथील निवास्थानी झालेल्या या भेटीमुळे नवनीत राणा पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नवनीत राणा कौर यांनी २०१४ साली अमरावती येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तीन लाखांहून अधिक मताधिक्क्य मिळाले होते. मात्र मादी लाटेमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राणा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जेष्ठ नेते अजित पवार यांची भेट घेतल्याने नवनीत राणा पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अमरावतीची लोकसभा जागा राष्ट्रवादी कडे राहणार कि कॉंग्रेस कडे जाणार यावर राणा यांचे भवितव्य अवलंबून असून नवनीत यांनी तिकीट मिळवण्यासाठी तयारीला सुरवात केली असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून नवनीत यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतली होती. तसेच त्यांचे पती रवी राणा यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या लागटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधान आले होते.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment