माढ्यात प्रचाराची चुरस वाढली ; धवलदादांची घेतली रणजितदादांनी भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माढा प्रतिनिधी । माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराची चुरस वाढली असून धवलसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात भेट झाल्याने भाजपचे पारडे जड होताना दिसू लागले आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांचे स्वतःचे वेगळे संघटन आहे. त्या संघटनांचा फायदा भाजपच्या उमेदवाराने मिळणार असल्याचे आता चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

माढा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच असा चंग बांधलेल्या भाजपच्या नेत्यांनी बांधला आहे. अशातच मुत्सद्दी मोहिते पाटीलांचे रणनीती तंत्र भाजपच्या जोडीला आहे. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांची सभा देखील अकलूज या ठिकाणी पार पडल्या पासून माढा मतदारसंघात वातावरण अधिकच भाजपमय होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे छोटे मोठे काठावरचे नेते आपलेसे करण्यास भाजपला यश मिळू लागले आहे.

धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चुलते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात बऱ्याच वर्षांपासून सर्वकाही आलबेल नव्हते. मात्र धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेल्याने त्यांच्या भाजपमध्ये समाविष्ट होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. तसेच मोहिते पाटील घराण्यातील सिंहांचा वाद आता मिटणार असे देखील बोलले जाऊ लागले होते. मात्र अद्याप या बाबत कोणीच हात पुढे केला नाही. तर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे मोहिते पाटील घराण्यातील वाद मिटावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आजहि दोन दादांच्या भेटीदरम्यान राजेंद्र राऊत राऊत त्यांच्या सोबत होते. आता या भेटीने माढ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Comment