विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीला ममता, मायावती गैरहजर; आम आदमी पक्षानेही मारली दांडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । जामिया मिलिया विद्यापीठ आणि जेएनयूमधील हिंसाचाराच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधी पक्षांची महत्वपूर्ण बैठक काँग्रेसने सोमवारी बोलावली आहे. मात्र, या बैठकीकडे आम आदमी पक्षासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पाठ फिरवली आहे. महत्त्वाच्या प्रश्नावर एकी हवी असताना सरकारच्या विरोधकांमध्येच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीत सर्वच महत्वपूर्ण मुद्यांवर विस्तृत चर्चा होणार आहे. शिवाय, केंद्र सरकारविरोधाती आगामी काळातील रणनिती देखील ठरवली जाणार आहे. या बैठकीस एनसीपी, डीएमके, इंडियन यूनियन मुस्लीम लीग, डावी आघाडी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टीसह केंद्र सरकारविरोधातील जवळपास सर्वच पक्षांची उपस्थिती राहणार आहे. आज दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे.

बैठकीतील महत्वाचा मुद्दा जेएनयू, जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठमधील हिंसाचार राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष चुकीचं राजकारण करत असल्यामुळे आपण यात सहभागी नसल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

Leave a Comment