महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार?? -प्रकाश आंबेडकरांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थकित वीज बिलांच्या प्रश्नांवरुन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार हे एकदा स्पष्ट करा असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.  “महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून चुका कबूल केल्या आहेत. आमच्याकडून काही चुका घडलेल्या आहेत. त्यामुळे दुरुस्ती करावी. 50 टक्के वीजबिल माफ कराण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार परस्पर सवलत नाकारतात. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही प्रश्न विचारतो, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण? याचा खुलासा करा”, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडक यांनी केला.

अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्याचा खुलासा केला तर अधिक चांगलं होईल. अन्यथा वीजबिल भरु नका. वीजबिल विरोधात आम्ही आंदोलन सुरु केलं आहे, ते आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र करु, असा इशारा आम्ही सरकारला देत आहोत”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

“महावितरणाचे अधिकारी चुका कबुल करत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंगचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली नव्हती. पण त्यांना मीटर रिडींग घेण्यापासून बंदी करण्यात आली. त्यामुळे मीटरचं रिडींग कन्सोलिटेडरित्या ठरवण्यात आलं. कन्सोलिटेड युनीट ठरला की तुमचा स्लॅब बदलला”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment