माझा तोफखाना तयार आहे आचारसंहिता लागू द्या मग बघा – राज ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

पुणे प्रतिनिधि |  दररोज आणि नेहमी बोललच पाहिंजे अस काही नसतं घरात एखादा जास्त बोलत आसेल् तर तुम्हाला माहितिये कधीचा हा बाहर जातोय अस घरात म्हणतात कमी बोलाव आणि वेळ आल्यावर बोलाव हे जमल पाहिजे. माणसाने वारंवार बोलत राहिल्यावर कालांतराने वीट येते तस न होण्यासाठी कमी शब्दात जास्त म्हनन मांडायला हव. पण माझा तोफखाना तयार आहे फक्त आचारसंहिता लागू द्या मग बघा म्हणत राज यांनी राजकीय विषय जाणीवपूर्वक टाळला.

राज ठाकरेंनी उपस्थितांना अत्यंत कमी शब्दात मार्गदर्शन केलं. ते पुण्यातल्या कोंढवा भागात एका शाळेच्या उद्घाटना साठी आले होते. पुण्यातील २ नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी राज ठाकरेंना थोडक्यात संबोधाव अशी विनंती केली.

दरम्यान राज ठाकरे यांनी राजकीय विषयात हात घालत आपल्या नगरसेवकंच कौतुक केलं आणि १६२ नगरसेवक असलेल्या पुण्यात सर्व नगरसेवक निवडून द्या मग चमत्कार पहा आणि हा चमत्कार तुमच्या नशीबी असेल तर त्यावर तुम्हीही काम करण आवश्यक असून ते तुम्ही करू शकता अस म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Comment