सरकारमध्ये नाराजी आहे ; पण…. संजय राऊतांचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज लोक असतातच. इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. त्यात नाराजी आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे, पण तरीही सरकार टिकेल,’ असा ठाम विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकड्या तलवारीची लढाई होती’, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना रोखठोक’ या सदरात म्हटलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काल एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्तानं ‘सामना’त लिहिलेल्या लेखात संजय राऊत यांनी सरकार स्थापनेच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर, विरोधकांकडून घेतले जाणारे आक्षेप व केल्या जाणाऱ्या भाकितांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘ठाकरे सरकार’ हे नैसर्गिक मानावेच लागेल. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी ३३ भिन्न विचारांच्या पक्षांचे ‘एनडीए’ सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे? असा सवालही राऊतांनी यावेळी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment