सपना चौधरी म्हणाली,”कोण केजरीवाल? मी कोणत्याही केजरीवालला ओळखत नाही!”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशा वेळी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना प्रचार मैदानात उतरवलं आहे. गेल्या वर्षी हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश होता. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून ती भाजपचा प्रचार करत आहे. दिल्लीच्या पालम भागात भाजप उमेदवाराकरीता प्रचार करत असताना सपना चौधरीने न्यूज १८ या वृत्तवाहिनीशी खास बातचीत केली. यावेळी तिला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर सपनाने आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. सपना म्हणाली ”अरविंद केजरीवाल कोण आहे? मी कोणत्याही केजरीवालला ओळखत नाही!” आपल्या उत्तरातून सपनाने एकप्रकारे केजरीवाल यांच्यावर उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवली.

मनोज तिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री व्हावे
निवडणूक प्रचाराचा अनुभव सांगताना सपना म्हणाली की, ”मी माझ्या डोळ्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सकारात्मक प्रतिसाद पाहत आहे. मला नक्की विश्वास आहे दिल्लीत भाजपचाच विजय होईल.” दिल्लीत कमळ निश्चित फुलेल आणि दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होताच मनोज तिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे.” असं सपना यावेळी म्हणाली.

शाहीन बागच्या विरोध प्रदर्शनांचा भाजपवर परिणाम होणार नाही

शाहीन बागच्या मुद्यावर सपना चौधरी म्हणाली,” शाहिनबागचा मुद्दा हा एक नकारात्मक विषय आहे आणि मला नकारात्मक विषयावर बोलायला आवडत नाही. आणि मला असं वाटते की तिथे आंदोलनाला बसलेल्यांनी आता उठून घरी जावे.”नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) शाहीन बागेत सुरू असलेल्या प्रदर्शनांचा या निवडणुकीवर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही, कारण प्रत्येकाला योग्य-अयोग्य माहित आहे आणि दिल्लीतील लोक उच्च शिक्षित आहेत.

Leave a Comment