अखेर शंकरराव गडाखांनी केला शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

मुंबई । जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (shankarrao gadakh) यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आज दुपारी शंकरराव गडाख यांनी मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते त्यांनी शिव बंधन बांधून घेत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. मिलिंद नार्वेकर यांची शंकरराव गडाख यांच्यासमवेत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याने विधानसभेत गडाख अपक्ष निवडून येताच नार्वेकर यांनी गडाखांना सेनेत येण्यासाठी आग्रह धरला होता.

शिवसेना सतेत असो वा नसो मी तुमच्याबरोबर राहील असा ठाम शब्द गडाखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अखेर गडाख यांनी सेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार यशवंतराव गडाख यांचेही अत्यंत सलोख्याचे संबंध होते. दुसऱ्या पिढीतील दोन्ही कुटुंबातील सदस्य आता शिव बंधनात बांधले गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook