नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कार्यकर्ते अजूनही संभ्रमात

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत मात्र या सगळ्यांमध्ये कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये अजूनही संभ्रम आहे तो म्हणजे अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचा खासदारकीचा उमेदवार कोण कारण लोकसभेचे विपुल वाजून बरेच दिवस झालेत मात्र अनेक राजकीय घडामोडीमुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत ठरलेला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कडून गेल्या वर्षभरापासून तयारी करणारे सुजय विखे अचानक भाजपमध्ये गेले तर नगर दक्षिण मध्ये भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून सुजय विखे यांना उमेदवारी देणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले तर या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून सर्वात आधी विधान परिषदेचे आमदार अरुणकाका जगताप यांचे नाव लोकसभेसाठी सुचवण्यात आलं होतं तर पुन्हा दोन दिवसांपासून सोशल मीडियावर विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकू लागले आहेत.

तर दिलीप गांधी गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून असल्याने आणि त्यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवली असल्यामुळे नेमकं भाजपचे तिकीट कोणाला भेटणार हा संभ्रम अजूनही कार्यकर्त्यांमध्ये आहे. सुजय विखे यांनी आपल्या फोटोवर क मशीन लावून आपणच भाजपचे उमेदवार असल्याचं सांगितला आहे त्यामुळे जोपर्यंत अधिकृत यादी जाहीर होत नाही तोपर्यंत नगरमध्ये भाजप-सेना युतीचा आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात राहणार आहेत यात काही अनपेक्षित बदल झाला तर ही घटना अजूनही बुचकळ्यात टाकणारी असणार आहे.

Leave a Comment