संख्याबळ भाजप सेनेचे, सभापती मात्र या पक्षाचा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी|सुशिल थोरात

साडे चार वर्षाचा भाजप सेना युतीचा रडीचा खेळ जनतेपासून लपुन राहिला नाही. या वादविवादाचे अनेक वेळा नुकसान झाले आहे. याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहमदनगर मधील होय.
केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्या भलेही युती ची घोषणा झाली असली तरी अहमदनगर महानगर पालिकेत मात्र अजूनही युती होण्याची चिन्हे दिसत नाहीत अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी बसपा चे नगरसेवक मुद्दसर शेख यांची निवड झाल्याने सेना भाजप यांच्यातील बेबनाव दिसून आला आहे.
महानगर पालिकेच्या सत्ता स्थापने वेळी भाजपने नैसर्गिक साथीदार सेनेला सोडून राष्ट्रवादी च्या पाठिंबायवर सत्ता स्थापन केली. मात्र त्या नंतर केंद्रात आणि राज्यात युती ची घोषणा झाली होती ,त्यामुळे या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन सभापती म्हणून युतीतील कोणताही नगरसेवक सभापती म्हणून बसवतील असे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे संख्याबळ जास्त असूनही भाजपने बसपा आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदी बसपाचे मुदस्सर शेख यांची निवड झाली आहे त्यामुळे राज्यात आणि केंद्रात युती होऊनही अहमदनगर शहराच्या महापालिकेत युती तुटलेली दिसते याचा परिणाम आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकावर होऊ शकतो.

भाजपची शिवसेनेला धोबीपछाड स्थायी समिती पदी बसपाचे मुद्दसर शेख यांची अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समिती पदी निवड शिवसेनेचे योगीराज गाडे यांना सहा मते तर बसपाचे मुद्स्सर शेख यांना मिळाली दहा मते

Leave a Comment