जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील यांच्यात ‘ही’ चर्चा झाली…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या घरी जाऊ भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

“सुजय विखे पाटील आज घरी आले होते. एक तास आमच्यात चर्चा झाली. पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते त्यांच्या मेडिकलच्या कॉलेज संदर्भात आलेले. विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने दुसऱ्या पक्षात जाऊ नये असं काही नाही.”, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने, सुजय विखे यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता सुजय विखे यांनी भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादीवर आपसूक दबाव वाढणारअसल्याची चिन्ह दिसत आहेत.

 
इतर महत्वाचे –

विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘असे’ जागावाटप

गडचिरोलीत ११ हजार महिला व विद्यार्थ्यांनी केली साडेसहा कि.मी.ची मानवी साखळी…

भारिप प्रणित – सम्यक विद्यार्थी आंदोलन, शाहु कॉलेज शाखेचं उद्घाटन…

Leave a Comment