राजकारण बाजूला ठेवून दुःखाच्या प्रसंगी शरद पवार आणि विजयसिंह आले एकत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकलूज प्रतिनिधी | माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आतड्याच्या कर्करोगाने काल निधन झाले. रणजितसिंह मोहिते पाटील जरी राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये गेले असले आणि विजयसिंहांची तशीच काहीशी भूमिका असली तरी हनुमंतराव डोळस आजारपणामुळे आपली राजकीय भूमिका घेऊ शकले नव्हते. त्यामुळे त्याअर्थी ते राष्ट्रवादीतच होते. अशा परिस्थिती शरद पवार यांनी आपल्या पक्षातील आमदाराच्या अंत्यविधीला जाणे पसंद केले.

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

शरद पवार यांना काल हनुमंत डोळस यांच्या निधनाची वार्ता मिळताच त्यांनी त्यांच्या अंत्यविधीला जाण्याचे जाहीर केले. तर त्याच बरोबर माध्यमात देखील या बातम्या येऊ लागल्या कि विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार भाजप सलगी नंतर प्रथमच आमने सामने येणार. या माध्यमांच्या भाकीत नुसार दोघेही एकत्र आले. एकत्र आले तेव्हा दोघे हि एकमेकाच्या शेजारी देखील बसले. दोघात चर्चा देखील झाल्या. मात्र ते नेमके काय बोलले हे बाहेर येऊ शकले नाही.

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

आमदार हनुमंत डोळस यांच्यावर माळशिरस तालुक्यातील त्यांच्या दसूर या मूळगावी अंत्यसंकार करण्यात आले. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह संपूर्ण मोहिते पाटील परिवार या वेळी उपस्थित होता. याच बरोबर शरद पवार , अजित पवार ,आमदार अप्पासाहेब रुपनवर, आमदार दत्तात्रय भरणे आदी राजकीय मंडळी उपस्थित होती. राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी हनुमंत डोळस यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले होते. शोकाकुल वातावरणात हनुमंत डोळस यांना अंतिम निरोप देण्यात आला.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

तुम्ही भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवा ; राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस

पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला

पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ

 

 

Leave a Comment