..जेव्हा ममता आणि शहा जेवणाच्या टेबलवर येतात आमने-सामने; फोटो व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशाच्या भुवनेश्वर येथे एकत्र जेवण केल्याचे छायाचित्र समोर आलं आहे. या छायाचित्रात त्यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सुद्धा जेवताना दिसत आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार या सर्व नेत्यांनी पटनाईक यांच्या निवासस्थानी जेवण केले.

वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये गृहमंत्री अमित शहा, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, नवीन पटनायक आणि धर्मेंद्र प्रधान एकत्र जेवताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्री झाल्यानंतर शाह प्रथमच ओडिशाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पटनायक यांनी शहा यांना त्यांच्या निवासस्थानी जेवणासाठी बोलावले. तसेच ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ईझेडसीची बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व प्रादेशिक परिषद (ईझेडसी) भुवनेश्वर येथे सुरू आहे. ईझेडसीच्या २४ व्या बैठकीत उडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सहभागी झाले आहेत. या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अर्थमंत्री रामेश्वर ओराओं यांना बैठकीसाठी नियुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोरेन यांच्या बैठकीत गैरहजेरीचे कोणतेही कारण सांगण्यात आले नाही, परंतु झारखंड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यामुळे ते कदाचित आले नाहीत असा कयास लावला जात आहे. मुख्यमंत्री उडीसाचे पटनायक हे परिषदेचे उपाध्यक्ष असून त्यात राज्य व केंद्रातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment