राजकारण सुरु! राजस्थान सरकारनं पाठवलं यूपी सरकारला विद्यार्थ्यांना बसनं सोडण्याचं बिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । संपूर्ण देश कोरोनाच्या संकटतात असताना याही काळात राजकीय पक्षांनी राजकारणाला विश्रांती दिली नाही. लॉकडाउनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या नेतृत्वातील राजस्थान सरकारने उत्तर प्रदेशात बसेसद्वारे सोडले. राजस्थान सरकारने याचे ३६ लाख ३६ हजार इतके भाडे आकारले. तर उत्तर प्रदेश सरकारने हे भाडे शुक्रवारी चुकते केले. दरम्यान, आता या बिल प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकारने राजस्थान सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी ३६ लाख रुपयांचे भाडे मागणाऱ्या राजस्थान सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. विद्यार्थ्यांना बसनं सोडण्याचं बिल पाठवणं हा राजस्थान सरकारचा अमानवीय चेहरा असल्याचे ते म्हणाले.एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातील हजारो विद्यार्थ्यांना कोटा येथून त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरी पोहोचवण्यात आले होते. हे सर्व विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते.

दरम्यान, कोटा येथे फसलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आम्ही बसेस उपलब्ध केल्या होत्या, मात्र आम्हाला अतिरिक्त बसेसची आवश्यकता होती. त्यामुळं कोटा येथे उपलब्ध असलेल्या राजस्थान परिवहन महामंडळाच्या बसेस या विद्यार्थ्यांना आग्रा आणि मथुरा येथे सोडण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. दरम्यान आता या बसेसचे सर्व भाडे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाने चुकवले असल्याची माहिती उत्तरप्रदेश राज्य परिवहन महामंडळाचे संचालक राज शेखर यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment