भैरवनाथ संस्था निवडणुक : वारूंजीसह 6 गावातील राजकारण तापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
तालुक्यातील केसे येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 21 रोजी होत आहे. या संस्थेच्या निवडणूकीमुळे वारूंजी पंचक्रोशीतील राजकारण चांगलेच तापले आहे. स्व. विलासराव पाटील (काका) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या विरोधात सर्व समावेशक पॅनेल अशी लढत होत आहे. तब्बल 17 जागेसाठी 34 उमेदवार रिंगणात असून प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोप- प्रत्यारोच्या फैरी झाडू लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांनी 450 ते 500 सभासदांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप चांगलाच गाजत आहे. त्यामुळे आता कपबशी की पतंग जिंकणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेत एकूण 1400 सभासद असून त्यातील 900 सभासद मतदानास पात्र आहेत. केसे गावासह वारूंजी, गोटे, मुंढे, सुपने, पाडळी व कराड शहरातही काही मतदार आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील गावा- गावात सध्या या निवडणुकीची एकच चर्चा सुरू आहे. सत्ताधारी व विरोधी दोन्ही पॅनेल यापूर्वी एकत्रित होते. परंतु आता त्याच्यात फूट पडली असून सत्ताधारी श्री. भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलचे पंजाबराव पाटील, दाजी जमाले, विनायक शिंदे हे नेतृत्व करत आहेत. तर विरोधी श्री. भैरवनाथ परिवर्तन विकास पॅनेलचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील हे करत आहेत.

सत्ताधाऱ्यांनी अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा फोटो डावलला
सत्ताधारी आणि विरोधी गटात उंडाळकर समर्थक असल्याचे पहायला मिळत आहे. कारण सत्ताधारी गटाच्या बॅंनरवरती स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व. विलासराव पाटील- उंडाळकर, स्व. पी. डी. पाटील, स्व. जयवंतराव भोसले यांचे फोटो आहेत. तर विरोधी गटाच्या बॅंनरवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील यांचे फोटो आहेत. परंतु सत्ताधारी पॅनेलने अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा फोटो का डावलला आहे, यांचीही चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

सत्ताधारी श्री. भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेल उमेदवार ः- संजय कदम, आनंदराव जमाले, दिलावर पटेल, चंद्रकांत पाटील, पंजाबराव पाटील, प्रकाश पाटील, सिद्धेश्वर पाटील, अशोक शिंदे, महेश शिंदे, विनायकराव शिंदे, संभाजी साळवे, राहुल सावंत, आशाताई धुमाळ, सुशीला पाटील, दीपक कदम, जयसिंग गावडे, शब्बीर मुजावर.

विरोधी श्री. भैरवनाथ परिवर्तन विकास पॅनेल ः- दाजी (आबा) जमाले, तानाजी देशमुख, रफिक पटेल, हणमंत पवार, जगदीश पाटील, जयदीप पाटील, रणजीत पाटील, राजेंद्र पाटील, सर्जेराव पाटील, अण्णा शिंदे, पांडुरंग शिंदे, बापू शिंदे, सुनंदा पाटील, मालन सावंत, शिवाजी लोंढे, दिनकर येडगे, लालासो सुतार.