कलरफुल पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणांचा थाटामाटात साखरपुडा संपन्न; फोटो आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) यांचा 16 फेब्रुवारी रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी आणि पूजाच्या जवळील मंडळींनी हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पूजाने सिद्धेशसह फोटो शेअर करत आपण एंगेज झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यामुळे या दोघांच्या लग्नाचे सनई चौघडे कधी वाजतील? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात होता. अखेर काल या पूजा आणि सिद्धेशने साखरपुडा कार्यक्रम उरकून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

साखरपुड्यातील पूजाचा लुक

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पूजा सावंतने साखरपुड्यावेळी मराठमोळी साज केला होता. तर, सिद्धेश चव्हाणने गोल्डन कुर्ता आणि गोल्डन धोतर घातले होते. या पोशाखामध्ये दोघांची जोडी खूपच सुंदर आणि कलरफुल दिसून येत होती. हिरवी साडी, नाकात नथ, हातात बांगड्या, गळ्यामध्ये गोल्डन कलरचा नेकलेस पैंजण असा लुक पूजा सावंतने केला होता. त्यामुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलून दिसत होते. तसेच, काही वेळासाठी पूजाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा देखील घातला होता. तर सिद्धेशने पांढरा कुर्ता आणि कमीज घातली होती.

साखरपुड्याला कोणीकोणी हजेरी लावली?

पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्यासाठी अनेक कलाकार मंडळीसह पूजाच्या आणि त्यांच्या जवळील व्यक्ती आल्या होत्या. खास करून पूजाच्या जवळील म्हणजेच तिचे बेस्ट फ्रेंड भूषण प्रधान, प्रर्थना बेहरे, वैभव तत्ववादी हे देखील चांगले नटून थटून साखरपुड्यामध्ये आले होते. तसेच पूजाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री फुलवा, पूजा देशमुख, गश्मीर महाजनी या कलाकारांनी हजेरी लावली होती.

सोशल मीडियावर प्रेमाची कबूली

गेल्या 28 नोव्हेंबर रोजी पूजा सावंतने सोशल मीडियावर सिद्धेशसह फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र या फोटोमध्ये तिने सिद्धेशचा चेहरा दाखवला नव्हता. त्यामुळे पूजाचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार नेमका कोण आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. शेवटी 29 नोव्हेंबर रोजी पूजाने सिद्धेशचा चेहरा रिविल केला होता. यानंतरच सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या. अखेर काल पूजा आणि सिद्धेश ने आपला साखरपुडा देखील उडवून घेतला. त्यामुळे आता त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव करण्यात येत आहे.