व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अनोखा विवाहसोहळा!! तरुणीने श्रीकृष्णाशीच बांधली लग्नगाठ; कारणही सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थान येथील एका तरुणीने थेट देवाशीच लग्न केलं आहे. पूजा सिंह असं या तरुणीचे नाव असून तिने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या या अनोख्या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे.

३० वर्षीय पूजा सिंह हि शिकलेली तरुणी आहे. तिने राज्यशास्त्रात MA केले आहे. पूजाला आयुष्यभर अविवाहित राहायचं नव्हतं. तसेच तिची विचारसरणी थोडी वेगळी आहे. म्हणून तिने राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील गोविंदगडजवळील नरसिंहपुरा गावातील मंदिरात भगवान श्रीकृष्णाशी विवाह केला. सामान्य हिंदू विवाहसोहळ्यांप्रमाणेच सर्व विधी करून, सजावट करून, आणि ३०० लोकांच्या जेवणाची सोया करून अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पूर्ण झाला.

पूजाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते, त्यामुळे ते या लग्नाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र तिच्या आईने तिच्या निर्णयाला पाठिंबा देत आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात लावून दिले. पूजाने देवाशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याबाबत विचारलं असता समाजात महिलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये भांडणे, घटस्फोट हे आता सामान्य झाले आहे. मला वाटतं समाजात लग्न हे पूर्वीसारखे पवित्र नाते राहिलेले नाही. शिवाय, लग्नानंतर स्त्रियांची अवस्था अधिकच दयनीय होते असं मत पूजाने व्यक्त केलं.

मी तुलसी विवाहाबद्दल ऐकले होते. माझ्या आजोबांच्या घरीही एकदा पाहिलं होतं. विचार केला की जेव्हा ठाकुरजी तुळशीशी लग्न करू शकतात तर मी ठाकुरजीशी का नाही करू शकत. जेव्हा मी पंडितजींना याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी असेही सांगितले की असे होऊ शकते त्यांनतर मी हा निर्णय घेतला असे तिने सांगितलं.