भारतात लसींच्या तुटवड्याबाबत आदर पूनावाला यांनी दिली महत्वाची माहिती…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला लसींचा पुरवठा करण्यासाठी पत्र पाठवले आहे. मात्र कोव्हिडशील्ड लसीच्या भारतातल्या पुरवठ्यावरून आदर पूनावाला यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारतात आणखी दोन-तीन महिने करोना लसींचा तुटवडा जाणवत राहील असं मत सिरमचे आदर पूनावाला यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत बोलताना पूनावाला यांनी म्हटलं आहे की, ‘भारतात आणखी दोन-तीन महिने कोरोना लसीचा तुटवडा जाणवत राहील. साधरण जुलैपर्यंत अशीच परिस्थिती राहील सध्याच्या घडीला सिरम इन्स्टिट्यूट महिन्याला 60 ते 70 कोटी लसीचे उत्पादन करत आहे. जुलै महिन्यापर्यंत ही क्षमता 100 कोटी पर्यंत पोहोचेल असं आदर पूनावाला यांनी म्हटले आहे’.

काँग्रेस घेईल सुरक्षेची जबाबदारी, धमकी देणाऱ्या नेत्याच्या नावाचा खुलासा करा : नाना पटोले

सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना केंद्र सरकारनं y सुरक्षा पुरवण्याचा जाहीर केले आहे त्यानंतर. एका माध्यमाला मुलाखत देताना पूनावाला यांनी त्यांना बडे नेते जीवे मारण्याची धमकी देतात असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ‘काँग्रेस तुम्हाला पूर्ण सुरक्षा देईल पण तुम्ही देशातले लसीचे उत्पादन चालूच ठेवा असे म्हणत, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली आहे. याबरोबरच तुम्हाला धमकी देणाऱ्या बड्या नेत्याचे नाव तुम्ही सर्व सामान्य लोकांसमोर आणावे ‘असं देखील नाना पटोले यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

याबाबत बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, ‘लस पुरवण्याचा मोठं काम आदर पूनावला यांच्याकडे असताना काही मोठे नेते माझ्यावर दबाव आणतात मी जर बोललो तर माझा शिरच्छेद होईल असा मोठा खुलासा त्याने केला आहे ते नेते कोण आहेत हे उघड झालं पाहिजे कोणावर यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी काँग्रेस घेईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे’.

काय आहे प्रकरण ?

अदर पुनावाला सध्या परदेशात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘टाईम्स’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीने आता उद्योजकांच्या मनात धडकी भरवली आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून गंभीर स्वरूपाचे फोन कॉल्स येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

You might also like