Porsche Taycan 4S Black Edition : 18 मिनिटांत चार्ज, 668 KM रेंज; Porsche ची इलेक्ट्रिक कार बाजारात घालणार धुमाकूळ

Porsche Taycan 4S Black Edition
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Porsche Taycan 4S Black Edition । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेज आहे. पेट्रोल डिझेलच्या खर्चातून सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या नवनवीन गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याचा पार्श्वभूमीवर ब्रँडेड कंपनी Porsche आपली नवी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. Taycan 4S असं या गाडीचे नाव असून तिचे ब्लॅक एडिशन कंपनीने बाजारात आणलं आहे. हि कार सिंगल चार्ज मध्ये तब्बल ६६८ किमी पर्यंतचे अंतर पार करू शकते. मात्र तिची किंमत २.०७ कोटी रुपये आहे . आज आपण या सेडान कारचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

लूक आणि डिझाईन – Porsche Taycan 4S Black Edition

Porsche Taycan 4S Black Edition पूर्णपणे ब्लॅक कलर मध्ये दिसतेय. यामध्ये तुम्हाला फ्रंट एप्रन, साइड स्कर्ट, रिअर डिफ्यूझर आणि आउटसाइड मिरर व्ह्यू आहे. याशिवाय, बॅज आणि लेटरिंगवर हाय ग्लॉस ब्लॅक फिनिश देण्यात आला आहे. हेडलाइट्सना स्मोक्ड फिनिश देण्यात आले आहे आणि पांढऱ्या पोर्श प्रोजेक्शनसह पुडल लॅम्प्स देखील देण्यात आले आहेत. यात ग्लॉस ब्लॅक फिनिशमध्ये २१-इंच एरो डिझाइन अलॉय व्हील्स देखील आहेत. टायकॅन ४एस ब्लॅक एडिशनला स्टँडर्ड मॉडेल लेआउट मिळतो. यामध्ये तुम्हाला अनेक आधुनिक आणि आश्चर्यकारक वैशिष्ट्ये मिळतात. यामध्ये पॅनोरॉनिक सनरूफ, ३६० डिग्री कॅमेरा, एडीएएस सुई, १४ वे पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट, ४ झोन क्लायमेट कंट्रोल, ७१० वॅट्स १४ स्पीकर बोस साउंड सिस्टमचा समावेश आहे.

बॅटरी आणि रेंज –

Porsche Taycan 4S Black Edition चाय ब्लॅक एडिशन मध्ये कंपनीने १०५ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, ज्या एकत्रितपणे ५९८ एचपी पर्यंत पॉवर आणि ७१० एनएम पर्यंत टॉर्क जनरेट करतात. महत्वाची बाब म्हणजे हि इलेक्ट्रिक कार ३२० किलोवॅट डीसी फास्ट चार्जरने फक्त १८ मिनिटांत चार्ज होते. आणि एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ती तब्बल ६६८ किलोमीटर अंतर आरामात पार करू शकते असा दावा कंपनीने केला आहे. यादरम्यान हि लक्झरी कार फक्त ३.७ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग वाढवू शकते.

हि इलेक्ट्रिक कार १३ रंगात लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅक, व्हाइट, जेट ब्लॅक मेटॅलिक, आइस ग्रे मेटॅलिक, व्होल्कॅनो ग्रे, डोलोमाइट सिल्व्हर, जेंटियन ब्लू, कार्माइन रेड, प्रोव्हन्स (हलका जांभळा), नेपच्यून ब्लू, फ्रोझनबेरी (गुलाबी), फ्रोझन ब्लू आणि पर्पल स्काय मेटॅलिक या रंगाचा समावेश आहे.