औरंगाबाद : राष्ट्रवादी भवन औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व औरंगाबाद जिल्हा निरीक्षक जगन्नाथ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व पैठण आणि गंगापूरसाठी तालुका अध्यक्ष पदाच्या मुलाखती पार पडल्या. या आढावा बैठकी दरम्यान मार्गदर्शन करताना काकडे म्हणाले की, पद हे कार्यकर्त्यांनी दागिना म्हणून मिरवू नवे तर त्याला शस्त्र म्हणून सामाजहितासाठी त्याचा वापर करावा असे ते म्हणाले
कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी करावी. शरद पवार साहेबांचे अभाळाएव्हढे काम सर्वसामान्य लोकांनपर्यंत नेऊन संघटन वाढीवर भर द्यावा असेहिर ते बैठकीदरम्यान म्हणाले. दरम्यान आढावा बैठकीमध्ये औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे व जिल्ह्यातील पैठण व गंगापूर वगळता सर्वच तालुक्याच्या तालुकाध्यक्षानी आपले विचार व अडचणी मांडल्या तेव्हा त्यांची अडचणी ऐकून त्यांना पक्ष आपल्या पाठीमागे कुठल्याही अडी-अडचणीत भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही काकडे यांनी दिली.
या बैठकीला औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर, जिल्हा सरचिटणीस मयूर अंधारे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शरद पवार , सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष अनिल राऊत सिल्लोड, कल्याण पवार कन्नड, आदिनाथ साळुंके खुलताबाद, विजय मोरे फुलंब्री, प्रशांत शिंदे वैजापूर, शाहिद पटेल गंगापूर, प्रवीण शिंदे, नकुल वाघचौरे, ज्ञानेश्वर कागदे, ज्ञानेश्वर उघडे, अजय बोबडे, राजू भाई पठाण, जयराम कुटे, शुभम साळवे, आमण शेख, सद्दाम खान आणि जिल्हातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.