T20 वर्ल्डकप मधून हार्दिक पंड्याचा पत्ता कट?? त्या ट्विटने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात आयपीएल स्पर्धा सुरु असून त्यानंतर जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) रंगणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच वर्ल्डकप साठी संघ निवड होण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाकोणाला संधी मिळावी? याबाबत अनेक माजी खेळाडू वेगवेगळं मत जाहीर करत आहेत. मात्र आता निवड समितीचे माजी अध्यक्ष राहिलेल्या व्यंकटेश प्रसाद यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. एवढच नव्हे तर T20 वर्ल्डकप मधून हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) पत्ता कट होणार का? या चर्चाना बळ मिळत आहे.

व्यंकटेश प्रसाद यांचे ट्विट काय?

व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटमध्ये म्हटले,”शिवम दुबेच्या फिरकीविरुद्ध मोठे शॉट्स खेळण्याच्या क्षमतेसाठी, सूर्यकुमार यादव टी-२० मधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि रिंकू सिंग त्याच्या अपवादात्मक फिनिशिंग क्षमतेसाठी टी-२० विश्वचषकात या तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र खेळवण्याचा मार्ग भारतीय व्यवस्थापनाने शोधल्यास ते खूप फायदेशीर ठरेल. संघात विराट आणि रोहित यांच्या उपस्थितीमुळे, या पाच जणांनंतर केवळ एका यष्टीरक्षक फलंदाजासाठी जागा उरणार आहे. त्यामुळे हे मुद्दे लक्षात घेत संघबांधणी कशी होईल, हे पाहण्यासारखे असेल.

हार्दिकचा पत्ता कट??

व्यंकटेश प्रसाद यांचे ट्विट बारकाईने बघितल्यास अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा पत्ता वर्ल्डकप मध्ये कट होणार का अशा चर्चाना उधाण आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह बाकी ३ म्हणजे एकूण ५ खेळाडू झाले.. तर रोहित शर्मा यांच्यासोबत सलामीला येणार खेळाडू हा ६ वा खेळाडू झाला.. आणि व्यकंटेश प्रसाद ज्या खेळाडूबद्दल सांगतायत तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणजे ७ वा खेळाडू.. आणि बाकी ४ राहतात हे गोलंदाज असणार हे नक्की…. याचाच अर्थ शिवम दुबेमुळे हार्दिक पंड्याचे भारतीय संघातील स्थान धोक्यात तर येणार नाही ना?? अशा चर्चाना उधाण आलं आहे. T20 वर्ल्डकप मध्ये संधी न मिळाल्यास हार्दिकसाठी हा मोठा धक्का असेल.