पुण्यात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटांची शक्यता ? पोलीस आयुक्तांच्या पत्राने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईनंतर राज्यातलं सर्वात मोठं शहर असणारं पुणे आता हाय अलर्ट वर आलं आहे. पुण्यात एका बाजूला होणारे अपघात तर दुसऱ्या बाजूला पुण्याचं नाव आता गुन्हेगारी मुळे उजेडात आलं आहे. त्यातच आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या एका पत्रामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यात दहशतवाकडून बॉम्बस्फोटाची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे की एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा इशारा दिला. पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून पुणे शहरातल्या एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला हा धोक्याचा इशारा दिला आहे.

काय आहे पत्रात ?

हे हॉटेल पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात असून या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा अमर्यादित आवाज ठेवण्याबाबत , उशिरापर्यंत हॉटेल चालू ठेवणे आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा या हॉटेल बद्दल तक्रारी दाखल केलया आहेत. शिवाय या हॉटेल व्यवस्थापका कडून अनेकदा डिस्को थेक परवानातल्याअटीशर्थींचा भंग करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनीही वेळोवेळी या हॉटेल संदर्भात कारवाई केल्या आहेत परंतु यावर अनेकदा कानाडोळा केला जात असल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस पत्रातून करण्यात आला आहे.

दुर्घटना होण्याची शक्यता

कल्याणी नगर परिसरात असलेल्या या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आग, चेंगराचेंगरी, गॅस गळती, अफवा यासारखे घटना घडवून जीवित हानी होऊ शकते. तसेच सध्या अतिरेकी कारवायांबाबत अलर्ट आहेत. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे लक्ष करून बॉम्बस्फोटासारखे दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या हॉटेलचा डिस्को थेट परवाना रद्द का करण्यात येऊ नये ? असं या नोटीसद्वारे विचारणा केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या सहीने ही नोटीस असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त नितेश कुमार यांनीच ही शक्यता व्यक्त केल्याने पुणे पोलीस देखील अलर्ट मोडवर आहे. या हॉटेलमध्ये मोठी गर्दी होत असल्याच्या कारणाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो आहे. त्यामुळे जर एखादी मोठी घटना घडली तर त्यामुळे मोठी जीवित हानी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.