Post Office Franchise : Post Office सोबत सुरु करा ‘हा’ व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Franchise। मित्रानो, वाढती महागाई आणि अपुऱ्या नोकऱ्या यामुळे अनेक तरुणांचा कल हा व्यवसायाकडे वळत आहे. कोरोना काळानंतर तर अनेकांनी नवनवीन स्टार्टअप सुरु केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. परंतु व्यवसाय करताना पहिला प्रश्न पडतो तो ,म्हणजे नेमका कोणता व्यवसाय करायचा? भांडवल किती लागेल आणि त्यातून फायदा किती मिळेल. पण आता चिंता करू नका, आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही खूप कमी किमतीत सुरु करू शकता. हा व्यवसाय म्हणजे पोस्ट ऑफिसची फ्रेंचाइजी …. यामाध्यमातून तुम्ही दर महिन्याला लाखोंची कमाई करू शकता. चला तर याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊयात…

कशी होईल कमाई –

सध्या आपल्या देशात सुमारे 1.55 लाख पोस्ट ऑफिस आहेत. परंतु तरीही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस फ्रँचायझी खरेदी करुन तुम्ही बक्कळ पैसे कमवू शकता. पोस्ट ऑफिसची बरीच कामे असतात, ती तुम्ही करू शकता. त्यासाठी सर्व प्रॉडक्ट आणि सेवा पोस्टाकडून दिल्या जातात. या सर्व सेवांवर कमिशन दिले जाते आणि तुम्ही भलीमोठी कमाई करू शकता. तुम्हाला प्रति नोंदणीकृत पत्र 3 रुपये कमिशन मिळेल. 200 रुपयांवरील मनीऑर्डरसाठी 5 रुपये कमिशन आणि पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरीच्या विक्रीसाठी 5 टक्के कमिशन असेल.

पात्रता काय??

पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी (Post Office Franchise) खरेदी करण्यासाठी तुम्ही १० वी पास असणे आवश्यक आहे.
तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे
मोबाईल आणि कम्प्युटरबाबत चांगलं ज्ञान असावे

स्थानिक जनतेची भाषा तुम्हाला यावी
तुमच्याकडे पॅन कार्ड असावे

कुठे अर्ज करावा – Post Office Franchise

पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी,(https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf). येथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि फ्रँचायझीसाठी अर्ज करू शकता. निवड झाल्यावर, इंडिया पोस्टसोबत सामंजस्य करार करावा लागेल. सुरक्षा म्हणून, तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये 10,000 रुपये जमा करावे लागतील.