हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Post Office Gram Suraksha Yojana । भारतात पोस्टामध्ये केलेली गुंतवणूक कायम सुरक्षित मनाली जाते. यामुळेच बऱ्यापैकी भारतीय आपल्या कमाईमधून थोडी फार तरी रक्कम हि पोस्ट खात्यात सेविंग करत असतात. याशिवाय पोस्ट खाते हे कायम चांगल्या आणि फायद्याच्या योजना आणत असते. त्यामुळे अलीकडच्या काळात पोस्टात पैसे गुंतवणाऱ्या लोकांशी संख्या वाढली आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून ३५ लाखांचा फंड जमा करू शकता. होय, हि योजना नेमकी आहे तरी कोणती? यातून कशा प्रकारे फायदा होतोय ते आपण जाणून घेऊयात…
आम्ही तुम्हाला ज्या योजनेबद्दल सांगतोय ती आहे पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना (Post Office Gram Suraksha Yojana) … या योजनेत 19 ते 55 वर्षे वयातील कोणताही व्यक्ती गुंतवणूक करु शकतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणुकीवर कमीतकमी 10,000 ते जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते. या योजनेत गुंतवणुकीसाठी अनेक हप्त्यांचे पर्याय देखील उपलब्ध आहे. पॉलिसी धारकांसा मासिक, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक अशा हप्त्याची निवड करु शकतो. या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल तर पोस्ट कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती मिळू शकते. 1995 साली ग्रामीण टपाल जीवन विमा योजना सुरु करण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेला डोळ्यासमोर ठेवत ही योजना पोस्टाने सुरु केली आहे..
योजनेतून किती रक्कम मिळणार– Post Office Gram Suraksha Yojana
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत (Post Office Gram Suraksha Yojana) पॉलिसीधारक व्यक्तीला दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे दररोज केवळ 50 रुपयांची गुतंवणूक करावी लागणार आहे आणि कलावधी पूर्ण झाल्यानंतर 35 लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो. जर तुम्ही 19 वर्षाचे असताना 10 लाख रुपयांच्या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतणूक करू इच्छित असाल तर तुम्हाला वयाच्या 55 व्या वर्षी दर महिन्याला 1,515 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तर 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये दर महिन्याला जमा करावे लागतील.
पॉलिसीधारकाला वयाची 55 व्या वर्षी योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 31,60,000 रुपये, तर 58 व्या वर्षी कालावधी पूर्ण झाल्यावर 33,40,000 रुपये आणि वयाची 60 वर्षे पूर्ण करणा-या व्यक्तीला 34.60 लाख रुपये मिळतील. ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत व्यक्ती 80 वर्षांचा झाल्यावर ही रक्कम त्याला देण्यात येते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर उत्तराधिका-याला ही रक्कम देण्यात येते.




