Post Office PPF Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा 417 रूपयांची गुंतवणूक, आणि मिळवा 65 लाख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office PPF Scheme  | अनेक लोक भविष्याचा विचार करून आज काही ना काहीच बचत करून ठेवत असतात. आपण पगारातील काही रक्कम भविष्यासाठी ठेवत असतात. सध्या बाजारामध्ये अनेक नवनवीन गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु पोस्ट ऑफिस (Post Office PPF Scheme ) हा एक विश्वासू गुंतवणुकीचा मार्ग आहे. अनेक लोक यामध्ये गुंतवणूक करत असतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसमधील एका खास योजनेबद्दल माहिती देणार आहोत. त्यातून तुम्हाला खूप चांगले पैसे मिळू शकतात.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ (Post Office PPF Scheme )या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही जर दर महिन्याला 12,500 गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक जर तुम्ही 15 वर्षे चालू ठेवली, तर तुम्हाला चांगला परतावा येईल. म्हणजेच तुम्हाला दररोज 417 गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला 40.38 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची 22.50 लाख होईल आणि यातील व्याजातून तुम्हाला 18.18 लाख रुपये मिळतील. म्हणजे पुढील 15 वर्षासाठी 7.1% वार्षिक व्याजाच्या आधारावर ही योजना येईल.

65 लाखापेक्षा जास्त पैसे कमवा

या योजनेअंतर्गत जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल, तर 15 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येकी 5 वर्षासाठी दोनदा मुदतवाढ द्यावी लागेल. म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी हा आता 25 वर्षाचा असेल. त्यानंतर 25 वर्षानंतर तुम्हाला 1 कोटी रुपयांची रक्कम मिळेल. या कालावधीत तुमची गुंतवणुकी केवळ 37.50 लाख रुपये असेल आणि व्याजाचे उत्पन्न 65.58 लाख रुपये असेल. तुम्ही जर पीपीएफमध्ये खाते वाढवायचे असेल, तर मॅच्युरिटीच्या एक वर्षाआधी तुम्हाला अर्ज करावा लागेल.

कराचा लाभ | Post Office PPF Scheme 

पीपीएफ योजनेचा सर्वात मोठा लाभ हा आहे की, आयकरच्या नियम 80c अंतर्गत कर प्रदान करते. त्यामुळे तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर लाभ मिळतो. त्याचप्रमाणे पीपीएफ मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जात नाही. म्हणजेच या योजनेमध्ये गुंतवणूक करणे ही पूर्णपणे सुरक्षित आहे.