पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेतून कमवा करोडो रूपये; या पद्धतीने करा गुंतवणूक

Public Provident Fund Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या काळात पैशांची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये, एफडीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरत आहे. यात गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस च्या योजनांना अधिक प्राधान्य देत आहेत. कारण की इतर योजनांपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजना अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानल्या जात आहेत. पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (Public Provident Fund Scheme) तर अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. आज आपण याच योजनेविषयी जाणून घेणार आहोत.

योजनेविषयी सविस्तर माहिती

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजने अंतर्गत तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. ही योजना एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामध्ये सरकारकडून परताव्याची हमी दिली जाते. या योजनेअंतर्गत, तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर 7.1 टक्के चक्रवाढ व्याजदराचा लाभ मिळतो. यामध्ये गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. PPF खात्याची कालमर्यादा 15 वर्षांची आहे. यात तुम्ही 5-5 वर्षांसाठी गुंतवणूक कालावधी वाढवू शकता.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला करोडो रुपये कमवायचे असतील तर त्यासाठी दरमहा 12,500 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही एवढी गुंतवणूक 15 वर्षे सतत केली तर मॅच्युरिटी होईपर्यंत तुम्हाला एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यातील 22.50 लाख रुपये ही गुंतवलेली रक्कम असून उर्वरित रक्कम व्याजाची असेल. खास म्हणजे, जर तुम्ही हे खाते प्रत्येकी 5 वर्षांसाठी दोनदा वाढवले तर 25 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1.03 कोटी रुपयांचा निधी मिळेल. या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. त्यामुळे सर्व बाजूंनी ही योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे.