Post Office Recruitment | परीक्षा आणि मुलाखत न देता डाक ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Recruitment | ज्या लोकांना भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची इच्छा होती. त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आलेली आहे. ती म्हणजे आता डाक विभागात मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता ज्या लोकांना नोकरी करायची आहे त्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता या प्रक्रियेसाठी अर्ज करावे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी झालेली आहे. या प्रक्रिया बद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमची दहावी आणि बारावी देखील झालेली असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे आता दहावी आणि बारावीचे जे काही उमेदवार आहेत जे नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवली असता देखील याचा खूप फायदा होईल.

पोस्ट ऑफिसकडून ही प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमॅन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे आता तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाहिजे त्या पदासाठी अर्ज करू शकता.

या भरतीसाठी दहावी पास आणि बारावी पास असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. तुम्हालाही हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. तुम्हाला केवळ अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती तिथे मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे आधार कार्ड, दहावी पासचे प्रमाणपत्र, बारावी प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र पीडब्ल्यू प्रमाणपत्र, स्वाक्षरी आणि फोटो इत्यादी गोष्टी लागणार आहेत. या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करून अपलोड करायचे आहेत त्यानंतरच तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार आहे.