Post Office Saving Schemes | आता भविष्याचे नो टेन्शन, ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळणार सर्वोत्तम परतावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Saving Schemes | भविष्याचा विचार करून सगळेजण कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवणूक करत असतात. परंतु हे पैसे गुंतवताना आपण नेहमीच आपल्या पैशाच्या सुरक्षिततेचे आणि चांगल्या परताव्याचे मार्ग शोधत असतो. परंतु अनेकवेळा लोकांची फसवणूक होते. आणि त्यांच्या पैशाचे नुकसान होते. म्हणून अनेक लोक अशी गुंतवणूक करण्यास घाबरतात. परंतु जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, रिटायरमेंटसाठी आणि मुलांच्या लग्नासाठी पैसे गुंतवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी अत्यंत सुरक्षित मार्गाने बचत करण्याच्या काही योजना सांगणार आहोत. या योजनांना सरकार देखील हमी देत आहे.

भारतातील पोस्ट ऑफिस योजना (Post Office Saving Schemes) ही अत्यंत विश्वासहार्य योजना आहे. अगदी ब्रिटिश काळापासून ही योजना सुरू झालेली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये विविध प्रकारच्या आर्थिक सुविधा देखील असतात. तुम्ही यामध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा देखील मिळू शकता. तर आता आपण पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम बचत योजना जाणून घेऊया.

नॅशनल सेविंग आरडी योजना

ही योजना पोस्टमार्फत असते. यामध्ये एक आवर्त ठेव खाते असते. यामध्ये तुम्हाला 6.60% वार्षिक व्याजदर मिळते. या योजनेत अगदी 100 रुपयांपासून तुम्हाला गुंतवणूक करता येते. यातून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो.

नॅशनल सेविंग टाईम डिपॉझिट अकाउंट

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्हाला खूप चांगला व्याजदर मिळतो. यामध्ये तुम्हाला 6.9 ते 7.5 टक्के एवढा व्याजदर मिळतो. या योजनेत तुम्ही केवळ 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तसेच योजनेत तुम्हाला 100 च्या पटीत गुंतवणूक करता येते. यामध्ये कलम 80c अंतर्गत तुम्हाला दीड लाख पर्यंतच्या करामध्ये देखील सूट मिळते.

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते | Post Office Saving Schemes

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्हाला 7.4% दराने व्याज मिळते. तुम्ही या योजनेमध्ये देखील 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर तुम्ही जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता त्याचप्रमाणे तुमचे खाते संयुक्त असेल तर तुम्ही 9 लाख रुपये गुंतवू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना

तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 8.2% व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही 250 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर जास्तीत जास्त तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेतील तुम्हाला परतावा मिळतो.