Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमचे पैसे करणार दुप्पट, काही दिवसातच व्हाल श्रीमंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Scheme | आपल्या भविष्याची तरतूद करण्यासाठी अनेक लोक अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यापैकी शासनाची पोस्ट ऑफिस ही योजना खूप खात्रीशीर योजना आहे. यामध्ये अगदी प्रत्येक वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. आता आपण या पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. जी तुम्हाला खूप चांगली कमाई देईल. आणि तुम्हाला खूप सर्वाधिक व्याज देखील मिळेल. जे इतर कोणत्याही योजनेमध्ये तुम्हाला मिळणार नाही.

पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme )अनेक योजना आहेत. अनेक लोक देखील या योजनांवर विश्वास ठेवतात. यामध्ये तुम्ही अगदी कमी रक्कम गुंतवून त्यातून खूप चांगला नफा कमवू शकता. सरकारच्या या योजनेचे किसान विकास पत्र योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला दुपटीने परत मिळतील ही एक अल्पबचत योजना आहे या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवणुकीवर दर वर्षाला 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते.

या सरकारी योजने गुंतवणूक करण्यासाठी एक व्यक्ती यामध्ये खाते उघडू शकतात. त्याचप्रमाणे तीन लोकं मिळून देखील यामध्ये खाते उघडू शकतात. तुमच्या मुलांच्या वतीने देखील तुम्ही स्वतःच्या नावावर या सरकारच्या नवीन योजनेमध्ये खाते उघडू शकता.

ही योजना अगदी सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे. कारण या योजनेची सुरुवात तुम्ही अगदी 1000 रुपयाची गुंतवणूक करण्यापासून देखील करू शकता. तुम्ही 100 रुपयांच्या पटीमध्ये यामध्ये गुंतवणूक करून खूप चांगला नफा घेऊ शकता.

पोस्टाच्या (Post Office Scheme ) या किसान विकास पत्र योजनेमध्ये एका परिस्थितीनंतर हे खाते बंद केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील तुमचे हे खाते बंद केले जाऊ शकते.