Post Office Scheme | जाणून घ्या पोस्ट ऑफिसची नवी योजना, कमी गुंतवणुकीत मिळेल उत्तम परतावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Scheme | प्रत्येकजण बचत करण्याचे अनेक मार्ग शोधत असतात. जेणेकरून भविष्यात त्यांना लाभ होईल. यासाठी सध्या अनेक योजना उपलब्ध आहेत. परंतु त्यात पोस्ट ऑफिस ही बचत करण्याची अत्यंत लोकप्रिय योजना आहे. जर तुम्हीही कमी गुंतवणुकीत चांगली योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची एक नवीन योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जी तुमच्यासाठी अत्यंत उत्तम योजना ठरणार आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेच्या (Post Office Scheme) किसान विकास पत्र या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही एक अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दुप्पट परतावा मिळू शकता. भारत सरकारची ही अल्पबचत योजना असल्याने ती अतिशय सुरक्षित देखील मानली जाते. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 7.8% व्याज दिले जाते.

किसान विकास पत्र योजना

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे एकल प्रौढ व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खाते उघडू शकतात. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त 3 लोक संयुक्त खाते देखील उघडू शकतात. इतकेच नाही तर 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक त्यांच्या स्वतःच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र हे खाते उघडू शकतात.

किसान विकास पत्र योजनेची गुंतवणूक | Post Office Scheme

पोस्ट ऑफिसच्या किसान (Post Office Scheme) विकास पत्र या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तुम्ही शंभरच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवू शकता. यामध्ये कोणतीही मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. वित्तीय मंत्रालयाने वेळोवेळी विहित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत ठेवी परिपक्व होतील जे ठेवीच्या तारखेला लागू होते. या योजनेत गुंतवणुकीची रक्कम 115 महिन्यांमध्ये म्हणजेच 9वर्ष 7 महिन्यांमध्ये दुप्पट होते.

येथील माहितीनुसार क्रिसन विकास पत्र खाते (Post Office Scheme) हे विशिष्ट परिस्थितीतच मॅच्युरिटीपूर्वी बंद केले जाऊ शकते. एकल खाते किंवा संयुक्त खाते कोणत्याही एका किंवा इतर खातेधारकांच्या मृत्यूनंतर बंद केले जाऊ शकते. हेच खाते ठेवीच्या तारखेपासून 2 वर्षे ते 6 महिन्यानंतर बंद केले जाऊ शकते.