Post Office Scheme | आर्थिकदृष्ट्या भविष्याचा विचार करून अनेक लोक गुंतवणूक करत असतात. बाजारामध्ये देखील गुंतवणुकीसाठी अनेक नवनवीन योजना आलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक लोक गुंतवणूक देखील करतात. परंतु आपल्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. अशातच अनेक सरकारी योजना आहेत. किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये देखील अनेक लोक आर्थिक गुंतवणूक करत असतात. एक चांगली योजना आहे. ज्यातून तुम्हाला मंथली परतावा मिळणार आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना असे आहे.
पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) या मंथली इन्कम योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये गुंतवावे लागतात. तसेच तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये देखील गुंतवू शकता. या योजनेमध्ये तुम्ही जॉईंट खाते देखील चालू करू शकता. या खात्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. त्याचप्रमाणे पाच वर्षापर्यंत या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेचा व्याजदर हा 7.4% एवढा आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन गटातील लोकांना देखील या योजनेमध्ये खाते उघडता येते. तीन लोक मिळून देखील तुम्ही या योजनेत जॉईन खाते उघडू शकता.
तुम्ही जर या अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 5500 रुपये मिळतात. तसेच जॉईंट अकाउंट मध्ये तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तर महिन्याला तुम्हाला 9250 रुपये मिळतात. या योजनेत तुम्हाला 5 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते. जर या योजनेत एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हे जास्त असेल तर या योजनेतील व्याजदरावर त्यांना कर देखील भरावा लागतो.
जर पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) या योजनेतून तुम्हाला मध्येच पैसे काढायचे असेल, तर तुम्ही ते एक वर्षानंतर काढू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही एक ते तीन वर्षात पैसे काढले तर गुंतवणुकीमधील 2 टक्के रक्कम कापली जाते. तर तुम्ही तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर पैसे काढले तर तुमची केवळ 1 टक्के रक्कम कापली जाते. अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करून मंथली इन्कम चालू करू शकता.