हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |भारतीय पोस्ट ऑफिस हे भारतातील नागरिकांसाठी नवनवीन योजना चालवत असतात. त्यातही महिलांसाठी काही खास स्कीम असतात. भारतीय पोस्ट ऑफिस ही एक विश्वासहार्य योजना आहे. यामध्ये अनेक लोक गुंतवणूक करून भविष्यामध्ये खूप चांगला परतावा घेत असतात. अशातच महिलांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये खास स्कीम चालवली आहे. या योजनेअंतर्गत महिला दोन वर्षात श्रीमंत होऊ शकतात. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. (Post Office Scheme For Woman) महिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना भविष्यात खूप चांगला परतावा मिळतो.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
पोस्ट ऑफिसची महिला सन्मान बचत योजना प्रमाणपत्र ही एक विश्वासाची योजना आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नाही. यामध्ये तुम्हाला हमखास परतावा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दोन वर्षासाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करू शकतात. दोन वर्षाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज मिळते.
महिला स्वावलंबी होतील
सरकार हे महिलांना स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. या योजनेचा उद्देश देखील महिलांना स्वावलंबी करण्याचा आहे. या योजनेत जमा होणाऱ्या पैशावरही सरकारने करावर सूट दिली आहे. या योजनेत जर गुंतवणूक केली, तर सर्व महिलांना कर सवलत मिळणार आहे. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुली यामध्ये खाते उघडू शकतात.
तुम्हाला 31,125 रुपये व्याज मिळेल | Post Office Scheme For Woman
पोस्ट ऑफिसच्या या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेअंतर्गत दोन वर्षाच्या कालावधीसाठी महिलांना 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते. तुम्ही 2 लाख रुपये गुंतवल्यावर तुम्हाला पहिल्या वर्षी 15000 रुपयांनी दुसऱ्या वर्षी 16 हजार 125 रुपये एवढा परतावा मिळतो. म्हणजेच दोन वर्षात तुम्हाला लाख रुपयांच्या गुंतवणीच्या योजनेवर 31 हजार 125 रुपये व्याज मिळते.
ही महिलांसाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे. ज्यामुळे भविष्यात त्यांना खूप चांगला परतावा मिळेल आणि भविष्यातील वेगवेगळ्या आर्थिक गोष्टीची तरतूद देखील करता येईल.