Post Office Scheme | अनेक लोक हे भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी आजच गुंतवणूक करून ठेवत असतात. त्यांच्या पगारातील काही रक्कम ते गुंतवत असतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक योजना आहेत. ज्याचा फायदा अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना होतो. कारण पोस्ट ऑफिस ही एक विश्वासहार्य योजना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक यामध्ये गुंतवणूक करत आहेत. तुम्ही अगदी लहान बचत देखील करू शकता. आणि त्यातून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये (Post Office Scheme) महिलांसाठी खूप खास योजना असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला कमी वेळात तुमच्या गुंतवणुकीवर जास्त व्याज दिले जाते. आता या योजनेची गुंतवणूक आणि त्यापासून मिळणारे फायदे याची माहिती आपण जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिस देते 7.5 टक्के व्याज | Post Office Scheme
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिस द्वारे चालवणारी एक योजना आहे. महिलांसाठी ही एक विशेष योजना आहे. यावर खूप चांगले व्याज देखील मिळते. या योजनेमध्ये तुम्हाला कमी कालावधीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देखील मिळतो. या योजनेतून तुम्हाला 7.5% पर्यंत व्याज मिळते.
दोन वर्षांसाठी पैसे गुंतवावे
ही एक अल्पबचत योजना आहे. या योजनेमध्ये महिला केवळ दोन वर्षासाठीच गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही दोन लाख रुपये एवढी आहे. ही योजना खूप लोकप्रिय आणि महिलांच्या फायद्याची योजना आहे.
10 वर्षांखालील मुलींचाही समावेश | Post Office Scheme
महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशातून ही सरकारी पोस्ट ऑफिसची योजना अमलात आणलेली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर 7.5 टक्के दराने व्याज मिळते. तसेच प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 c अंतर्गत कर सवलतीचा देखील लाभ मिळतो. या योजनेची खास वैशिष्ट्य म्हणजे दहा वर्षे किंवा त्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलीचे देखील खाते यामध्ये उघडता येते.