Post Office Scheme | आजकाल सगळ्या लोकांना गुंतवणुकीचे महत्त्व चांगलेच पटलेले आहे. त्यामुळे अनेक लोक हे आपल्या उत्पन्नातील काही ना काही भाग भविष्यासाठी गुंतवून ठेवत असतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण आली, तरीही त्याला आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो. बचत करण्याचे सध्या मार्केटमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. परंतु अनेक लोक पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करतात. कारण पोस्ट ऑफिसची योजना (Post Office Scheme) ही एक विश्वासहार्य योजना आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही योजना लोकांसाठी कार्यरत आहे. आणि ज्यातून लोकांना खूप चांगला परतावा देखील मिळालेला आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेक योजना आहेत. ज्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतो. अशातच आता पोस्ट ऑफिसची एक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जर ठराविक रक्कम गुंतवली तर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळेल. या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुम्हाला 7.4% व्याजदर मिळते. तसेच मॅच्युरिटीनंतरही खूप चांगला परतावा मिळेल.
पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्हाला 5 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत तुम्ही केवळ 1 हजार रुपयांची गुंतवणूक करून देखील तुमचे खाते चालू करू शकता. या मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा ही 9 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच तुमचे जर जॉईंट अकाउंट असेल तर तुम्ही या योजनेमध्ये 15 लाख रुपयांपर्यंत देखील गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटी नंतर दर महिन्याला उत्पन्न चालू होईल. या योजनेत तुम्ही मॅच्युरिटी आधी देखील अकाउंट बंद करू शकत नाही. तर तुम्ही तीन वर्षाच्या आधी हे पैसे काढले, तर तुम्हाला दोन टक्के चार्ज द्यावे लागेल, तर पाच वर्षाच्या आधी बंद केले तर 1 टक्का चार्ज द्यावा लागेल.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्ही 5 वर्षासाठी 5 लाख रुपयांचे गुंतवणूक केली, तर त्यावर तुम्हाला 7.4% एवढा व्याजदर मिळेल. म्हणजेच तुम्हाला महिन्याला 3084 रुपये मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला महिन्याला 5550 रुपये मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचा फॉर्म भरावा लागेल. तसेच तुम्हाला तिथे पॅन कार्ड आधार कार्डचे फोटो असे आवश्यक कागदपत्र देखील जमा करावे लागतील.