Post Office Scheme | आजकाल महागाईचा विचार करून अनेक लोक भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीचे महत्त्व आजकाल सगळ्यांनाच पटलेले आहेत. त्यामुळे अनेक लोक हे त्यांच्या मासिक पगारातून काही ना काही हिस्सा त्यांच्या भविष्यासाठी राखून ठेवत असतात. सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, तरी देखील अनेक लोक खात्री करून आपले पैसे कसे सुरक्षित राहतील? आणि चांगला परतावा कसा मिळेल? या दृष्टीने गुंतवणूक करत असतात. त्यातही अनेक लोक एसआयपीच्या माध्यमातून लाखो रुपये गुंतवत आहेत. त्याचप्रमाणे पोस्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढलेली आहे. पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) ही एक विश्वासहार्य योजना आहे.
पोस्टाची (Post Office Scheme) अशीच एक आरडी योजना आहे. जी रिपेरिंग डिपॉझिट नावाने चालू आहे. या योजनेमध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो. तसेच तुमचे पैसे खात्रीशीर राहतात. या योजनेत तुम्ही केवळ 100 रुपये गुंतवून देखील सुरुवात करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला जवळपास 6.7% दराने व्याजदर मिळते.
पोस्टाची आरडी योजना | Post Office Scheme
जर तुम्ही पोस्टाच्या खात्यात दर महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक केली. आणि ही गुंतवणूक पुढील पाच वर्षासाठी केली, तर मॅच्युरिटी नंतर गुंतवणूक करायला 2. 14 लाख रुपये मिळतात. या योजनेत तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम ही 1 लाख 80 हजार रुपये एवढी असेल तर व्याजामध्ये तुम्हाला 34 हजार 97 रुपये मिळतील. तुम्ही जर 100 रुपयांपासून देखील सुरुवात केली तरी तुम्ही चांगला फंड जमा करू शकता.
पोस्टाच्या आरडी योजनेबद्दल महत्वाची माहिती
पोस्टाच्या या योजनेमध्ये तुम्हाला विविध सुविधा मिळतात यामध्ये तुम्ही दहा-दहा रुपयांची मल्टिपल गुंतवणूक देखील करू शकतात. तसेच स्मॉल सेविंग स्कीममध्ये तुम्ही एकापेक्षा अधिक खाते देखील चालू करू शकता. यामुळे तुमचा चांगला आर्थिक फायदा होईल.