Post Office Scheme |आजकाल आर्थिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. भविष्याचा विचार करता आर्थिक सुरक्षितता असणे खूप गरजेचे आहे. आजकाल मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत. पोस्ट ऑफिस मधून देखील अनेक योजना आहेत. त्यामुळे अनेक लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस मधून गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर मिळते. तसेच इतर अनेक सुविधा देखील उपलब्ध होतात. त्यामुळे पोस्ट खाते ही एक विश्वासाहार्य योजना बनलेली आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत योजना आहेत. अशीच एक पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आहे. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करू शकता. आणि त्यातून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला एकदाच एक ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला नियमितपणे त्यातून उत्पन्न मिळेल. आता ही योजना नक्की काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना ? | Post Office Scheme
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम योजनेमध्ये आला तुम्ही गेलेल्या गुंतवणुकीवर 7.4% वार्षिक व्याज मिळते. यामध्ये तुम्ही सिंगल अकाउंट देखील उघडू शकता. या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 9 लाख रुपये गुंतवू शकता. तसेच तुमचे जॉईंट अकाउंट असेल तर तुम्हाला 15 लाख रुपये देखील गुंतवता येतात. या योजनेचे सगळ्यात चांगले वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला 100 टक्के परताव्याची हमी असते. आणि तुम्ही गुंतवलेले पैसे देखील अगदी सुरक्षित.
पोस्ट ऑफिसच्या या मंथली इन्कम स्किममध्ये तुम्हाला खाते उघडायचे असेल, तर तुम्ही कमीत कमी 1000 रुपये गुंतवणे गरजेचे आहे. तुम्ही 1000 च्या पटीत पुढील पैसे गुंतवणूक शकता. एका सिंगल अकाउंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. तर जॉईंट अकाउंट मध्ये तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेमध्ये तुम्हाला दर वर्षाला 7.4 टक्के व्याजदर मिळते. तसेच तुम्ही जमा केलेल्या पैशावर जे व्याज मिळते ते बारा महिन्यात विभागले जाते. आणि इतर प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला ही योजना पुढे सुरू ठेवायची असेल, तर नवीन व्याजदर लागू होईल.
या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर त्या तारखेपासून पुढील एक वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या खात्यातून तुम्हाला पैसे काढता येत नाही. अंतर्गत तुम्ही खाते उघडले तर त्या तारखेपासून एक वर्षानंतर आणि तीन वर्षांपूर्वी योजना बंद केली, तर मूळ रकमेच्या 2 टक्के रक्कम कमी केली जाईल. त्याचप्रमाणे खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन वर्षानंतर आणि पाच वर्षाच्या आधी जर खाते बंद केले, तर मूळ रकमेच्या 1% रक्कम कमी केली जाईल.