Post Office Scheme : सध्याच्या महागाईच्या काळात भविष्यात आपल्याला कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आपण पैशाची गुंतवणूक करतो. परंतु ही गुंतवणूक करत असताना आपले पैसे सुरक्षित राहावे आणि रिटर्न सुद्धा भरगोस मिळावा असा आपला विचार असतो. सध्याच्या जगात बँक एफडी, पोस्ट ऑफिस, केंद्र सरकारच्या योजना, विमा, म्युचुअल फंड आणि शेअर मार्केट असे काही गुंतवणुकीचे पर्याय आहेत. परंतु कोणतीही रिस्क न घेता गुंतवणूक करण्याकडे सर्वचजण प्राधान्य देतात. अशावेळी पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. तुम्ही सुद्धा पोस्टात पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशा एका योजेनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला बँक एफडी पेक्षाही जास्त रिटर्न मिळेल. आणि महत्वाचे टॅक्सपासूनही तुमची सुटका होऊ शकतो.
आम्ही तुम्हाला ज्या योजनेबद्दल सांगत आहोत तिचे नाव आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट… या योजनेमध्ये ग्राहकांना ७.७ टक्के व्याजदर आहे. पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत, हा व्याजदर चक्रवाढीच्या आधारावर दिला जातो. यामध्ये, गुंतवणुकीच्या 5 वर्षानंतरच व्याजाची रक्कम खात्यात हस्तांतरित केली जाते. तुम्ही जर विचार केलात तर इतकं कोणत्याही बँकेत जरी तुम्ही गुंतवणूक केली तरी इतका व्याजदर मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी पोस्टाच्या या योजनेत (Post Office Scheme) पैसे गुंतवणे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. तुम्हाला या योजनेचा संपूर्ण लाभ घ्यायचा असेल तर संपूर्ण ५ वर्षाच्या लॉक इन पिरेड साठी पैसे ठेवावे लागतील. जर तुम्ही मध्येच तुमचे पैसे काढले तर तुम्हाला व्याज मिळणार नाही.
टॅक्स मधून मिळेल सूट – Post Office Scheme
या सरकारी योजनेत (National Savings Certificate) तुम्ही किमान फक्त 1000 रुपये जमा करून खाते उघडू शकता. आणि यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता. या योजनेत गुंतवणूक करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणज तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीच्या रकमेवर कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही कर सूटचा दावा करून एका आर्थिक वर्षात जास्तीत जातीस 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता.