Post Office Scheme | 115 महिन्यात पैसे होणार डबल; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची नवी योजना

Post Office Scheme

Post Office Scheme | आज काल आर्थिक गुंतवणुकीचे ज्ञान मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या मासिक पगारातून काही ना काही हिस्सा हा त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करून ठेवतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण आली तर आपण जमा केलेला फंड आपल्याला वेळेला उपयोगी येईल. मार्केटमध्ये देखील गुंतवणुकीच्या अनेक पर्यायी उपलब्ध आहेत. परंतु हे पैसे गुंतवणे जोखमीचे असते. त्यामुळे अनेक लोक सुरक्षित गुंतवणूक करतात. अशा वेळी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर ठरते. यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतात आणि चांगला परतावा देखील मिळतो.

पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणुकीच्या विविध योजना नागरिकांसाठी देत आहेत. तुम्ही काही महिने किंवा वर्षासाठी देखील ठराविक रक्कम भरून चांगली गुंतवणूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही 115 महिन्यात पैसे गुंतवू शकता आणि त्यानंतर तुमचे पैसे डबल होतील.

किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसची एक लोकप्रिय योजना आहेत या योजनेमध्ये 115 महिने तुम्हाला पैसे गुंतवावे लागतात. त्यानंतर तुम्हाला डबल पैसे मिळतात. ही योजना नक्की काय आहे? हे आपण जाणून घेऊया. पोस्ट ऑफिसच्या किसान पत्र योजनेअंतर्गत तुम्हाला कितीही खाती उघडता येतातम या योजनेवर सध्या 7.5% एवढे व्याजदर मिळतेम दर तीन महिन्यांनी या वास व्याजदरात बदल होत असतो. या योजनेमध्ये दोन प्रकारचे खाती असतात एक म्हणजे KVP आणि दुसरं म्हणजे NCS खाते. आता ही खाती कशी उघडायची हे आपण जाणून घेणार आहोत.

  • तुम्ही सगळ्यात आधी पोस्ट ऑफिस मध्ये KVP आणि दुसऱ्या NCS खाते असा लॉगिन अर्ज करा.
  • यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्ही जनरल सर्विसेस वर जा.
  • त्यानंतर सर्विस रिक्वेस्टवर जाऊन शेवटी नवीन रिक्वेस्ट वर क्लिक करा.
  • यासाठी NCS खाते उघडण्यासाठी NCS खात्यावर क्लिक करा तसेच KVP खाते उघडण्यासाठी KVP खात्यावर क्लिक करा.
  • NCS खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम जमा करा यासाठी तुम्हाला किमान 1000 किंवा 100 च्या पटीत रक्कम भरावी लागेल.
  • त्यानंतर पोस्ट ऑफिस बचत खात्याची लिंक केलेले डेबिट कार्ड निवडा.
  • अति आणि सर्दी वाचा आणि त्यानंतर क्लिक सबमिट वर क्लिक करा.
  • ऑनलाइन खाते बंद करा
  • त्यानंतर तुम्ही ट्रांजेक्शन पासवर्ड टाकून सबमिट बटनावर क्लिक करा