Post Office Scheme | भविष्याचा विचार करून अनेक लोक आत्ताच गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक करण्यासाठी बाजारांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहे. परंतु बाजारामध्ये गुंतवणूक करताना त्यात जोखीम देखील घ्यावे लागते. परंतु बँकेमध्ये FD करणे हे अत्यंत सुरक्षित असते. अलीकडेच आता बँकांनी एफडीवर ग्राहकांना चांगले व्याजदर देण्यास सुरुवात देखील केलेली आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांचे बँकेच्या एफडीकडे जास्त आकर्षण होत आहे. अनेक महिला गुंतवणूकदार देखील आता मोठ्या प्रमाणात यादीमध्ये गुंतवणूक करत आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला एफडीपेक्षा जास्त व्याजदर देणाऱ्या एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसची एका भन्नाट योजना आहे. या योजनेमध्ये बँकेच्या जास्त परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) ही एक विश्वासहार्य योजना आहे. गेल्या कित्येक वर्षापासून यात गुंतवणूक करताना दिसत आहेत. शिवाय पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक एफडीप्रमाणे सुरक्षित आहे. त्याचप्रमाणे या योजनेवर खात्रीशीर परतावा देखील मिळतो. त्यामुळे अनेक लोक आजकाल पोस्ट ऑफि मध्ये बचत करत आहेत.
पोस्ट ऑफिस या योजनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुंतवणूक केलेली आहे काही दिवसांपूर्वी वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी आपली उमेदवारी अर्ज सादर केला. आणि त्यांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील दिला आहे. यावेळी त्यांनी पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीममध्ये 9 लाख 12 हजार रुपयाची गुंतवणूक असल्याचे सांगितलेले आहे. आता आपण या पोस्टाच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम ? | Post Office Scheme
ही एक सरकारी योजना आहे. यामध्ये गुंतवणूक तुम्हाला पूर्णपणे खात्रीशीर आहे. आणि यात चांगला परतावा देखील मिळतो. ही एक डिपॉझिट स्कीम असून या योजनेवर सध्या 7.7 टक्के दराने व्याजदर दिले जाते. ही योजना पाच वर्षासाठी असते.
या योजनेमध्ये सिंगल अकाउंट देखील चालू केले जाते. ज्या मुलांची 18 वर्षे पूर्ण नाही. ते मुलांना आपल्या आई-वडिलांच्या नावाने देखील गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. तर कमाल गुंतवणुकीसाठी मर्यादा दिलेली आहे. तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक तुम्ही करू शकता. तसेच कलम 80 cअंतर्गत कर सवलत देखील मिळते.
पीएम मोदी एवढी गुंतवणूक केली तर किती रक्कम रिटर्न मिळणार
तुम्ही जर पीएम मोदी यांनी केलेली गुंतवणूक 9 लाख 12 हजार रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर पाच वर्षांनी 13 लाख 21 हजार 519 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 4 लाख 9 हजार 519 रुपये तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहे.