Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि व्याजाच्या पैशातच कमवा लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Post Office Scheme अनेकलोक हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने आज-काल त्यांच्या पगारातील काही भाग गुंतवणूक करत असतात. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या अनेक ठिकाणी देखील आजकाल गुंतवणूक वाढलेली आहे. परंतु यामध्ये जोखीम देखील आहे.

आजकाल सगळेजण त्यांच्या सुरक्षित गुंतवणुकीला (Post Office Scheme) प्राधान्य देतात. कारण ते त्यांच्या भविष्यसाठी गुंतवणूक करत असतात. त्यामुळे त्यांचे पैसे सुरक्षित असणे आणि त्यातून चांगला परतावा येणे. ही त्यांच्यासाठी खूप गरजेचे असते. अशावेळी बँकेमध्ये एफडी योजना, आरडी योजना, पोस्ट ऑफिसची योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना यासारख्या अनेक योजना आहेत. ज्या अत्यंत सुरक्षित आहे आणि त्यातून खूप चांगला परतावा मिळतो.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ही योजना लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण चालू शकतात. या गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांना केवळ व्याजाद्वारे लाखो रुपये कमवता येतात. आज आपण पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या टाईम्स डिपॉझिट योजनेला अनेकजण एफडी योजना म्हणून देखील ओळखतात. ही एक पंचवार्षिक योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदाराचे संपूर्ण पैसे हे सुरक्षित असतात. त्याप्रमाणे टाईम डिपॉझिट योजनेमधून चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळे अनेक जण टाईम डिपॉझिट या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना | Post Office Scheme

पोस्ट ऑफिसची टाइम पॉझिटिवेशन ही एफडी योजनेसारखी आहे. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांवर पोस्ट ऑफिसकडून तुम्हाला व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 7.5% या दराने व्याज मिळते. 2023 पूर्वी या योजनेवर 7 टक्के व्याज मिळायचे. परंतु 2023 पासून या योजनेवर 7.5% या दराने व्याज मिळते.

5 वर्षाच्या कालावधीसाठी मिळते सर्वात जास्त व्याज

या योजनेत तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, किंवा पाच वर्षासाठी पैसे जमा करू शकता. तुम्ही जर एका वर्षासाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला 6.9% दराने व्याज मिळेल. तुम्ही जर दोन ते तीन वर्षासाठी गुंतवणतील 7 टक्के व्याज मिळेल आणि जर तुम्ही 5 वर्षासाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेतून 7.5% दराने व्याज मिळेल.