Post Office Scheme : पोस्ट ऑफीसची आकर्षक योजना!! 3000 रुपये गुंतवून मिळवा 10 लाखांचा फंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत. विविध योजनांचा लाभ व परतावा वेगवेगळा आहे. गरीब लोकांना पोस्टाच्या या स्कीम्सची माहिती नसल्याने ते पोस्टात बचत करण्यास धजावत नाहीत. परंतु पोस्टाच्या सर्वच योजना सर्वसामान्य आणि गरिबांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, त्यामाध्यमातून तुम्ही रोजच्या गुंतवणुकीतून १० लाख रुपयांचा फंड जमा करू शकता. ही योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF).

PPF मधून कसे जमा होतील 10 लाख- Post Office Scheme

शहरच नव्हे तर गावागावांत पोस्टाच्या प्रत्येक शाखेत अनेक गुंतवणुकीचे प्लॅन उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना ऑनलाईन किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा मिळत असते. ही सुविधा वापरून ग्राहक पोस्टात गुंतवणूक (Post Office Scheme) करू शकता. शक्यतो पोस्टातील गुंतवणुकीवर सर्वांचा विश्वास असतो, पोस्टातील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. या गुंतवणुकीत रक्कम न मिळण्याची काळजी, चिंता नसते. तुम्ही जर PPF योजनेत दर महिन्याला ३००० रुपयांची गुंतवणूक केली तर 15 वर्षात 10 लाख रुपये जमा करू शकता. दरमहा ३००० रुपयांच्या गुंतवणुकीतून जेव्हा 15 वर्षे संपतील तेव्हा तुमची एकूण गुंतवणूक 5 लाख 40 हजार रुपये असेल यावर 7.1 टक्के दराने 4 लाख 36 हजार 370 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच 15 वर्षांत व्याज आणि मुद्दल रकमेचे मिळून एकूण रक्कम 9 लाख 76 हजार 370 रुपये मिळतील

80C अंतर्गत कर लाभ

पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये (Post Office Scheme) PPF योजनेत रक्कम गुंतवल्यास ग्राहकाला 80C अंतर्गत कर लाभ सुद्धा प्राप्त होतो. या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ग्राहक सूट मिळन्यास पात्र ठरतो. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज आणि परिपक्वता रक्कमेस ग्राहकांसाठी सरकारने करमुक्तीचा लाभ दिला आहे. पीपीएफमधील गुंतवणूक ट्रिपल ई श्रेणीत गणली जाते.