हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) कोणताही गुंतवणूकदार पैसे गुंतवण्याआधी सुरक्षा आणि निश्चित परतावा या दोन गोष्टी पडताळतो. कारण आपण कमावलेला पैसे योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवला तरच फायदा होतो, हे सगळेच जाणतात. गेल्या काही काळात मार्केटमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगली पसंती मिळाल्याचे दिसले आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसदेखील आपल्या गुंतवणूकदार वर्गासाठी कायम वेगवेगळ्या आणि फायदेशीर योजना घेऊन येत असते. ज्या कायम मार्केटमध्ये खळबळ उडवताना दिसतात. आजही आपण अशाच एका धमाकेदार योजनेची माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणारे मालामाल होत आहेत.
पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना (Post Office Scheme)
जर तुम्ही सर्वोत्कृष्ट योजनेच्या शोधात असाल तर पोस्टाची ही योजना तुमच्यासाठी एकदम करेक्ट आणि बेस्ट आहे असे समजा. कारण गुंतवणूक करून भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या योजनेचे नाव आहे आरडी योजना. जी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाते आणि यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळू शकतो. या योजनेत सामील होण्यासाठी ज्या गोष्टी माहित असायला हव्या त्याविषयी आज आपण माहिती घेत आहोत.
आरडी योजना
पोस्ट ऑफिसची आरडी योजना हीभविष्यातील आर्थिक अडचणींवर तोडा ठरू शकते. ती कशी? याविषयी जाणून घेऊ. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. ५ वर्षानंतर ही योजना मॅच्युअर झाल्यास तुम्हाला एकरकमी रक्कम प्रदान केली जाते. (Post Office Scheme)
आरडी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दरमहा किमान ७ हजार रुपयांची गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. म्हणजे, तुम्हाला योजनेच्या ५ वर्षाच्या कालावधीत एकूण ४,२०,००० रुपये गुंतवावे लागतील. (Post Office Scheme) यावर तुम्हाला योजनेंतर्गत ६.७% व्याजदर मिळेल. आता कॅल्क्युलेशननुसार योजनेच्या परिपक्वतेवर तुम्हाला ५ वर्षानंतर ७९,५६४ रुपये इतके व्याज मिळेल.
आता तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि मिळालेले व्याज एकत्र केल्यास लक्षात येते की, आरडी योजनेच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला मिळणारी एकूण रक्कम ही ४,९९,५६४ रुपये इतकी अर्थात सुमारे ५ लाख रुपये अगदी सहज होईल. इतकेच नव्हे तर आरडी योजना परिपक्व होण्याआधी तुम्ही योजनेचा कालावधी पुढील ५ वर्ष वाढवू शकता. म्हणजे तुम्ही एकूण १० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.
(Post Office Scheme) असे केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ८,४०,००० रुपये इतकी होईल आणि यावर तुम्हाला ६.७% टक्के व्याजदर मिळेल. ज्यानुसार, १० वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या परिपक्वतेवर तुम्हाला एकूण ३,५५,९८२ रुपये इतके व्याज दिले जाईल. अर्थात तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीनंतर मिळणारी एकूण रक्कम ही ११,९५,९८२ रुपये इतकी असेल.
कशी कराल गुंतवणूक?
जर तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेचा एक भाग व्हायचे असेल यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल. सगळ्यात आधी तुम्हाला पोस्टात या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. (Post Office Scheme) त्यानंतर प्रत्येक महिन्याला ठरल्यानुसार ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. असे केल्यास तुम्ही या योजनेत सहभागी होऊन योजनेच्या म्यॅच्युरिटीवर एकूण जमा झालेली रक्कम व्याजासह मिळवू शकाल.